शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन

 खोपोली | संतोषी म्हात्रे |

रायगड जिल्ह्यात होणाऱ्या आगामी रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती व ग्रामपंचायती इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्षाची भूमिका काय असेल, कार्यकर्त्यांनी कोणत्या पद्धतीने तयारीला लागायचे आहे, त्याचप्रमाणे इतर पक्ष पातळीवरच्या धोरणांवर विचार विनिमय करण्याकरता रविवार दिनांक 17 ऑक्टोंबर 2021 रोजी खोपोली शहरातील समर्थ मंगल कार्यालयात शेतकरी कामगार पक्ष – कार्यकर्ता मेळावा आयोजीत केला आहे.

या आयोजनात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटिल आणि इतर मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. 

दिनांक 17 ऑक्टोबर 2021 रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खोपोलीत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या घटनाक्रमा संदर्भातील शेतकरी कामगार पक्षाचे  ज्येष्ठ नेते किशोर पाटील यांनी दिलेली माहिती.

Exit mobile version