शौर्या तुला वंदितो कार्यक्रमाचे आयोजन

। पेण । वार्ताहर ।
शौर्या तुला वंदितो हा कार्यक्रम सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने पुर्ण महाराष्ट्रात 16 डिसेंबर ला आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये भारत मातेच्या रक्षणासाठी ज्या वीर पुत्रांनी या देशासाठी बलिदान दिले. तसेच कारगील युद्धातील पराक्रमी वीर पुत्रांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र यांनी घेतला आहे. 16 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात 50 ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून पेण येथे रायगड जिल्ह्यातील वीर पुत्रांचा सत्कार सोहळा पेण महात्मा गांधी मंदीर वाचनालयाच्या भव्य पटांगणावर सांयकाळी 4 वाजता होणार असून या कार्यक्रमाच्या वेळी देश भक्तिपर गीत गायन देखील होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे सह्याद्री प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष समीर म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

Exit mobile version