संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीचे आयोजन

रायगडातून पाच हजार कार्यकर्ते जाणार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
लखिमपूर खेरीच्या शहिद शेतकर्‍यांच्या अस्थिकलशांना मानवंदना देण्यासाठी 27 नोव्हेंबर तसेच रविवार दि. 28 नोव्हेंबर रोजी संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे. या महापंचायतीला राज्यभरातून शेतकरी कामगार पक्ष मोठया संख्येने सहभागी होणार असून एकटया रायगड जिल्ह्यातून 5 हजार कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिली. शेकापक्षाच्या जिल्हा चिटणीस मंडळाची बैठक बुधवारी पार पडली या बैठकीत आ. जयंत पाटील यांनी सदर संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीला मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.


या बैठकीला आ. जयंत पाटील यांच्यासह माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, माजी आमदार धैर्यशिल पाटील, जिल्हा चिटणीस अ‍ॅड आस्वाद पाटील, पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, पनवेल मनपाचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती अ‍ॅड निलीमा पाटील, समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, नारायण घरत आदींसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीनिमित्ताने नियोजन करण्यात आले. लखिमपूर खेरीच्या शहिद शेतकर्‍यांचे अस्थिकलश संपूर्ण राज्यभर मानवदंना देणेकरिता फिरवण्यात येणार असून, हे सर्व अस्थिकलश शनिवार दि. 27 नोव्हेंबर 2021 रोजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा (शिवाजी पार्क, दादर), मुंबई या ठिकाणी दुपारी 12.00 वाजता एकत्रित आणले जाणार आहेत. छत्रपतींच्या पुतळयासमोर या अस्थिकलशांना मानवंदना दिल्यानंतर हे अस्थिकलश घेवून वाहनजत्था अनुक्रमे चैत्यभूमी (दादर), हुतात्मा बाबू गेनूंचा पुतळा (परळ), आणि सायं.4.00 वाजता मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांचे पुतळयांसमोर मानवंदना दिल्यानंतर अस्थिकलशांना मानवंदना देणेचा कार्यक्रम त्यादिवसापुरता पार पडेल. शहिद शेतकर्‍यांचे अस्थिकलश शनिवारच्या रात्री भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या, बेलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात ठेवले जातील व तेथून सकाळी 11 वाजता आझाद मैदान, मुंबई येथील ङ्गङ्घसंयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीच्या सभा मंडपात आणले जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या शेतकरी-कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात सर्व डावे-पुरोगामी पक्ष-संघटनांच्या वतीने रविवार दि. 28नोव्हेंबर (महात्मा ज्योतीबा फुले यांचा स्मृतीदिन) 2021 रोजी ङ्गङ्घसंयुक्त शेतकरी कामगार महापंचायत चे आझाद मैदान, व्ही.टी. मुंबई याठिकाणी आयोजन केले आहे. या संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीला मार्गदर्शन करणेकरिता ङ्गसंयुक्त किसान मोर्चाफ चे राकेश टिकैत, डॉ दर्शन पाल, युध्दवीर सिंह, हनान मोल्ला, अतुलकुमार अंजान, राजाराम सिंह, आदि राष्ट्रीय किसान नेते उपस्थित राहणार आहेत.


नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील उद्दाम भाजप सरकारला अखेर आपला पराभव मान्य करीत तिन्ही शेतकरी विरोधी, जनविरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिणे द्भषी कायदे रद्द करण्याची घोषणा करणे भाग पडले. या कायद्यांविरुद्ध गेले वर्षभर प्रचंड दडपशाहीचा सामना करीत, प्रचंड त्याग करीत देशभरातील जे शेतकरी, शेतमजूर आणि कामगार जिद्दीने लढले, त्या सवार्ंचे भारतीय शेतकरी कामगार पक्ष मन:पूर्वक अभिनंदन करीत आहे. शेतकर्‍यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान आधारभावाची हमी दण्े ाारा (डैच्) कंद्रे ीय कायदा करा ही कळीची मागणी सरकारने अद्याप मान्य केलेली नाही. ती मान्य न केल्यामुळे द्भषी अरिष्ट अधिक गडद झाले आणि गल्े या 25 वषार्ंत 4 लाखांहून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. या 4 लाख शेतकरी आत्महत्यांपैकी जवळपास 1 लाख आत्महत्या या मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या गेल्या 7 वषार्ंच्या कार्यकाळातच झाल्या आहेतगेले वर्षभर सुरू असलेल्या किसान संघर्षात सुमारे 700 शेतकर्‍यांचे बळी गेले आहेत, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार थेट दोषी आहे. पंतप्रधान आणि भाजप सरकारने आपल्या असंवेदनशील आणि आडमुठ्या भूमिकेमुळे झालेल्या शेकडो शेतकर्‍यांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून देशाची माफी मागावी आणि त्यांच्या कुटुंबाना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्ष करीत आहे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा संयुक्त किसान चळवळीने केलेला हा दुसरा पराभव आहे. शेतकर्‍यांच्या संयुक्त आंदोलनामुळे त्यांना यापूर्वी भूसंपादन अध्यादेश रोखण्यास भाग पाडले गेले होते. पंतप्रधानांची घोषणा म्हणजे शेतीचे कॉर्पोरेटीकरण आणि नवउदार आर्थिक धोरणांचा आक्रमक पाठपुरावा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांविरुद्धचा मोठा विजय आहे. भारतीय शेतकरी कामगार पक्ष या संयुक्त संघर्षातील सर्व हुतात्म्यांना अभिवादन करीत असून आपल्या सर्व मागण्या पूर्ण होईपयर्ंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार करत आहे.


कार्यकर्त्यांनी शनिवार दि. 27 नोव्हेंबर 2021 रोजीच्या शहिद किसान अस्थिकलश मानवंदना कार्यक्रम आणि रविवार दि. 28 नोव्हेंबर 2021 रोजीची ङ्गङ्घसंयुक्त शेतकरी कामगार महापंचायत या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता, परंतु दि.28नोव्हेंबर रोजीच्या संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतकरिता पक्षाचे कार्यकर्ते आणि सहानुभूतीदार जनता यांना शक्य तितक्या मोठ्या संख्येने मुंबईला घेवून यावे, असे आवाहन शेकापक्षाच्या वतीने सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version