क्रीडा स्पर्धांचे आयोजन

। माणगाव । प्रतिनिधी ।

माणगाव नगरपंचायत हद्दीतील राजिप खांदाड शाळेत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन गुरवारी (दि.28) सकाळी 9 वाजता करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन राजिपचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार व माणगाव पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सुरेखा तांबट यांच्या हस्ते होणार आहे. या दिवशी सकाळ सत्रात व्यक्तिमत्व विकास अंतर्गत स्पर्धा होणार असून दुपारच्या सत्रात वैयक्तिक सपर्धा होणार आहेत. या स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ याच दिवशी सायंकाळी 4 वाजता चारिझेन फौंडेशनचे प्रतिनिधी सतीश काळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ही स्पर्धा व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी उतेखोल केंद्राचे केंद्र प्रमुख शंकर शिंदे व त्यांचे सर्व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वर्ग विशेष परिश्रम घेत आहेत.

Exit mobile version