राज्यस्तरीय शुटींग बॉल स्पर्धेचे आयोजन

। खारेपाट । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील विद्युत क्रिडा मंडळ मांडवखार आयोजित राज्यस्तरीय शुटींग बॉल स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि.13) आयोजन केले आहे. मंडळाचे अध्यक्ष शंकर मोकल यांच्या अध्यक्षततेखाली रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रचे नामावंत संघ सहभागी होणार आहेत. त्या अनुषघांने संघ नायक, खेळाडू व क्रिडा रसिक प्रेक्षकांनी सदर स्पर्धेचा लाभ घ्यावा. सदर संघ गेली अनेक वर्ष सातत्याने स्पर्धा भरवित आहे.

सदर स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 15 हजार रुपये उद्योजक अमित नाईक यांनी दिले आहे. दुसरे पारितोषिक 11 हजार रुपये ग्रामस्थ मंडळ मांडवखार यांनी तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक 7 हजार रुपये अजित मोकल यांनी तसेच चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक 7 हजार रमेश पाटील यांनी दिले आहे. तसेच 5 ते 8 क्रमांक पर्यंत पारितोषिक देण्यात येणार आहेत. तसेच शुटींग बॉल स्पर्धेकरिता क्रमांक 1 ते 8 क्रमांकापर्यंत चषक मल्हार मोकल यांच्याकडून देण्यात येणार आहे व उत्कृष्ट नेटमन, डिफेन्स आणि मालिकावीर यांना चषक रत्नेश मोकल यांच्याकडून देण्यात येणार आहे.

Exit mobile version