| अलिबाग | प्रतिनिधी |
लायन्स क्लब मांडवा विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. याच सामाजिक दायित्वाच भाग म्हणून 22 ते 25 डिसेंबर 2023 या कालावधीत राजा शिवछत्रपती क्रीडांगण, किहीम येथे चार दिवसीय लायन्स किहीम फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारचे एकूण 130 स्टॉल्स फेस्टिव्हलप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र असणार आहेत.
लायन्स किहीम फेस्टिव्हलमधून संकलित होणार निधी लायन्स पॅथॉलॉजी लॅब, चोंढी-किहीमसाठी उपयोगात आणला जाणार आहे. लायन्स क्लब मांडवाची पॅथॉलॉजी लॅब चोंढी-किहीम अल्पदरात जनसेवेचे कार्य करीत आहे. तिच्या या कार्याला या फेस्टिव्हलच्या माध्यमातून बळ पुरविण्यात येणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये खवय्यांसाठी मटण, चिकन, मच्छी, तसेच मोदक, पुरणपोळी आदींचे जवळपास 50 फूड स्टॉल्स असून इतर 80 स्टाल्समध्ये विविध प्रकाची उत्पादने, साडी, ड्रेसमटेरियल, वेगवेळ्याप्रकारची भांडी, बँकांचे स्टॉल्स, चारचाकी गाड्यांचे प्रदर्शन आदी असणार आहे. तसेच महिलांसाठी खेळ पैठणीचा विशेष कार्यक्रम, मंगळागौर स्पर्धा, पाककला स्पर्धा, बालकलाकारांच्या प्रतिभेचा अविष्कार, शालेय विद्यार्थ्यांसाठी नृत्यस्पर्धा, तरुणाईसह सर्व वयोगटातील रसिकांना आकर्षित करणारी संगीतरजनी असे एकाहून एक सरस कार्यक्रम आणि धम्माल मस्ती या फेस्टिव्हलमध्ये अनुभवता येणार आहे.
या फेस्टिव्हलचे चेअरमन धवल राऊत असून नियोजन समितीत लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे उपाध्यक्ष नितीन अधिकारी, अमिष शिरगावकर, अरविंद घरत, अभिजीत गुरव, सुबोध राऊत, मोहन पाटील यांचा समावेश आहे.अधिक माहितीसाठी धवल राऊत, मो. 8805259999 याच्यांशी संपर्क साधावा असे आयोजकांनी सांगितले आहे.







