। मुंबई । प्रतिनिधी ।
मराठी भाषा दिनानिमित्त ‘माऊली मराठी, सावली मराठी’ हा विविधांगी अभिमान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा शुक्रवार दि.27 फेब्रुवारी रोजी विलेपार्ले (पूर्व) येथील मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात संध्याकाळी 6 वाजता साजरा होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन विलेपार्ले कल्चरल सेंटर आणि स्थानिक आमदार पराग अळवणी यांनी केले आहे. सारस्वत बँक प्रस्तुत हा कार्यक्रम विनामूल्य असून, अंतर्भूत नामवंत कलाकारांद्वारे प्रस्तुत भारूड, कथाकथन, वाघ्या मुरळी पारंपरिक नृत्य, सुप्रसिद्ध कवी, गीतकार प्रविण दवणे प्रस्तुत कवितेची आनंदयात्रा आणि मराठी भाषेला समृद्ध करणारी लोकप्रिय लोकगीते, अभंग, गोंधळ, पोवाडा, गवळण, लावणी, कोळीगीत, धनगर गीत, शेतकरी गीत, भक्तीगीत इ. लोकगीत प्रकारांचे सादरीकरण या कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सुविख्यात गझलकार भीमराव पांचाळे यांची उपस्थित असणार आहेत.
‘माऊली मराठी, सावली मराठी’ कार्यक्रमाचे आयोजन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606