तळा प्रीमियर लीगचे आयोजन

| तळा | वार्ताहर |

तळा क्रिकेट असोसिएशनतर्फे शहरातील आनंदवाडी मैदानावर 11 ते 13 मे असे तीन दिवस तळा प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण लिलाव पद्धतीने निवड केलेल्या या स्पर्धेसाठी एकूण आठ संघांनी सहभाग घेतला आहे.

ज्यामध्ये सोहम सुपरकिंग्ज, एसडी वॉरियर्स, संदीप मोरे फ्रेंड्स ग्रुप मेट मोहोल्ला, संत गाडगे बाबा परीट आळी, एकविरा स्पोर्ट्स भाई फायटर, अदिती तटकरे इलेव्हन आडनाळे, स्वराज जयराज इलेव्हन वाली व बीजेपी इलेव्हन तळा या आठ संघांचा समावेश आहे. तळा प्रीमियर लीगचे यंदाचे सहावे पर्व असून, यावर्षी विजेत्या संघास 60 हजार व आकर्षक चषक, तर उपविजेता संघास 40 हजार व आकर्षक चषक अशी बक्षिसांची रेलचेल असणार आहे. यासह उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, क्षेत्ररक्षक अशा विविध बक्षिसांचीसुद्धा खैरात असणार आहे. तसेच प्रत्येक क्रिकेट रसिकाला या सामन्यांचा मनमुराद आनंद घेता यावा यासाठी आयोजकांतर्फे युट्युबवर थेट प्रक्षेपणाचीदेखील सोय करण्यात आली आहे. या स्पर्धेतील आठही सहभागी संघ तुल्यबळ असल्यामुळे विजेत्या संघासाठी असलेली बक्षीस व आकर्षक चषक कोणत्या संघाला मिळते याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागून राहिली आहे.

Exit mobile version