उरणमध्ये गुढीपाडव्या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

ज्येष्ठ नागरिक मंडळाचे शोभायात्रेचे आयोजन

| उरण | वार्ताहर |
गुढीपाडवा म्हणजे मराठी वर्षाची सुरवात. उरण मध्ये मराठी नववर्षाचे स्वागत विविध सांस्कृतिक धार्मिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात केले जाते. याही वर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ज्येष्ठ नागरिक मंडळ उरण तर्फे सालाबाद प्रमाणे याहीवर्षा गुढीपाडवा निमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शोभा यात्रा उरण शहरात पेन्शनर्स पार्क येथून गणपती चौक, एन आय हायस्कूल मार्गे परत पेन्शनर्स पार्क या मार्गे काढण्यात येते. विविध सामाजिक संस्था संघटनेचा दरवर्षी शोभा यात्रेत मोठा सहभाग असतो. (दि.22) सकाळी 8.30 वा. पेन्शनर्स पार्क, उरण शहर येथून या गुढी पाडवा शोभायात्रेची सुरवात होणार आहे. तरी जास्तीत नागरिकांनी विविध सामाजिक संस्था संघटनांनी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष हसमुख भिंडे (पालू भिंडे), उपाध्यक्ष अरुण मोदी, सचिव उमेश नाईक आदींनी केले आहे.

वुमेन ऑफ विसडम तर्फे बाईक रॅलीचे आयोजन
गुढीपाडवा निमित्त (दि.22) सायंकाळी 4 वा. वूमेन ऑफ विसडम या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उरण शहरातील पेन्शनर्स पार्क येथून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नववर्षाचे स्वागत बाईक रॅलीने होणार असून सामाजिक कार्यकर्त्या सारिका पाटील यांच्या पुढाकाराने बाईक रॅली आयोजित करण्यात आले असून, सामाजिक कार्यकर्त्या संगीता प्रशांत पाटील या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे आहेत. सदर बाईक रॅली फक्त महिलांसाठीच असून या बाईक रॅलीत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. इच्छुक महिलांनी (सारिका सागर पाटील 9664979696) वर नाव नोंदणी करावे.

कोप्रोलीमध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
ॐ साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ कोप्रोली व श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मंगळवार (दि.21) ते बुधवार (दि.22) रोजी श्री साईबाबांचे साई चरित्र पारायण व श्री सत्यनारायण महापूजा व साई भंडा-यांचे आयोजन उरण तालुक्यातील कोप्रोली गावातील गणेश मंदिर येथे करण्यात आले आहे. श्री साई चरित्रपारायण वाचन, मध्यान्ह आरती, धूप आरती, शिवचरित्र व्याख्यान, कीर्तन, भजन, लोकगीत, भावगीत, महाप्रसाद आदी विविध कार्यक्रम गुढीपाडवा निमित्त कोप्रोली येथे आयोजित करण्यात आले आहे. ॐ साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ क्रोप्रोली व श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था आयोजित दोन दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यात सहभागी होऊन नागरिकांनी, साई भक्तांनी देवदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

Exit mobile version