जागतिक पर्यटन दिनानिमित्त दिवेआगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

। आदगाव । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर परिसरात जैवविविधतेचे अस्तित्व टिकवून व वाढवून स्थानिकांना पर्यटन व्यवसायात यश संपादन करण्यासाठी मार्गदर्शनपर विविध उपक्रम राबविले जातात. याच धर्तीवर जागतिक पर्यटन दिनानिमित्त काही उपक्रम मान्यवर, वनाधिकारी, पर्यटक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत राबविण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या संकटामुळे पर्यटन व्यवसायाला आलेली मरगळ दूर करून, परंतु त्याचवेळी आपल्या भागात असलेल्या जैवविविधतेचे संवर्धन, संगोपन करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जागतिक पर्यटन दिनानिमित्त मॅनग्रोव्ह फाऊंडेशन सेल, महाराष्ट्र वन विभाग तसेच निसर्ग पर्यटन गट दिवेआगर यांच्या संयुक्त विद्यमाने कांदळवन पायवाट, पक्षी दर्शन, पारंपरिक मासेमारी प्रात्यक्षिक तसेच समुद्रकिनारी मरीन वॉकचे आयोजन करून याद्वारे या विविध विषयांची माहिती उपस्थित तज्ज्ञांकडून पर्यटक व ग्रामस्थांना देण्यात आली. यावेळी समीर शिंदे (वनक्षेत्रपाल अलिबाग), मिलिंद राऊत (वनक्षेत्रपाल श्रीवर्धन), हृषीकेश भटकर (उपजीविका तज्ञ), अनिकेत पेनूरकर (उपजीविका सहकारी), संदेश अंभोरे (प्रकल्प समन्वयक,समुदशास्त्र), स्वाती महाले, निमिषा नारकर, प्रथमेश बारे(प्रकल्प समन्वयक, वन विभाग), विराज दाभोलकर (प्रकल्प समन्वयक, मत्स्य विभाग), दिवेआगर सरपंच उदय बापट, ग्रामसेवक शंकर मयेकर, आनंद वर्शिळ (वनरक्षक) सागर घुबे (वनरक्षक), सिद्धी कोसबे, सृष्टी तोडणकर, सानिका केळसकर, मेघ तोडणकर, राकेश केळसकर व श्रेयस तोडणकर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सिद्धेश कोसबे, स्वप्नील केळसकर, सुहास मार्कंडे, उत्कर्ष पिळणकर, मकरंद चितळे व देवेंद्र नार्वेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version