। माणगाव । प्रतिनिधी ।
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माणगावातील ढालघर येथील श्री गोरक्षनाथ मंदिरात नवरात्रोत्सव दि. 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या उत्सवात दैनंदिन पूजा, होमहवन, श्रीमद भगवतगीतेवर प्रवचने, भजन यांसारखे पारमार्थिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. उत्सवकाळात वैयक्तिक नामसाधना, ध्यानधारणा, देवदेवतांची विधिवत पुजा व श्री देवी यज्ञ विधी याचबरोबर शुक्रवारी (दि.11) सन 2023-24 शैक्षणिक वर्षातील माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दादा शिंदे, खाडे महाराज, खेमचंद मेथा यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. तसेच, नवनाथ सांप्रदायी, नवीन नामधारक दिक्षा विधी या दिवशी घेण्यात आला.