नारी जागृती महोत्सवाचे आयोजन

। अलिबाग । वार्ताहर ।
महिला दिनानिमित्त 12 ते 20 मार्च या दरम्यान नारी जागृती महोत्सव हा विशेष कार्यक्रम संपूर्ण भारतातील महिला शक्तीसाठी सहज योग ध्यान केंद्र प्रतिष्ठान पुणे येथून निःशुल्क आँनलाईन आयोजित केलेला आहे.
आत्म साक्षात्कारी नारी-सक्षम नारी, आत्मसाक्षात्कारी नारी-आत्मनिर्भर नारी या संकल्पनेवर आधारित अभियानामध्ये 9 दिवस 9 सत्र दररोज सायंकाळी 5 वा.मराठीतून आणि संध्याकाळी 6.00वा हिंदीतून WWW.narilearningsahajyoga.org या वेबसाईटवर आँनलाईन सत्र तसेच युट्यूब चैनल मार्फत लाईव्ह प्रसारित करण्यात येणार आहे. भारतीय अध्यात्मिक शास्त्रामध्ये नारीला शक्ती म्हणून संबोधले जाते प्रत्येक महिलांमधील कुंडलिनी शक्तीचे जागरण झाल्यास महिला आत्मनिर्भर आणि सक्षम होऊ शकतात या उद्देशाने माताजी निर्मला देवी 5 मे 1970 रोजी सहजयोग ध्यानाची शास्त्रीय पध्दत सुरु केली. या सहजयोग महिला जागृती महोत्सवामध्ये नवीन महिला साधकांनी टोल फ्री क्रमांक 18002700800 वर संपर्क साधावा अधिक माहितीसाठी महाराष्ट्र कमिटी सदस्य संजय पाटील(9322082065) भरत पाटील, (9892631141)यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version