। खांब । वार्ताहर ।
दीपक फाऊंडेशन आणि दीपक नायट्राईट यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतखार येथे मोफत अस्थिरोग आणि फिजिओथेरपी शिबीर 26 सप्टेंबर रोजी घेण्यात आले होते. या शिबिरात डॉ. प्रशांत गोसावी, कीर्ती कुलकर्णी यांनी रुग्ण तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून व उपचार देण्यात आले. या शिबिराचे नियोजन दीपक फाऊंडेशनचे अजय आवाडे, डॉ. प्रियंका नरवणकर, अक्षरा जाधव, अश्विनी एत, सेजल घोरपडे यांनी केले. यावेळी 110 रुग्णांची तपासणी करून त्यांना औषध उपचार करण्यात आले. या शिबिराला सरपंच, उपसरपंच, सदस्य, कर्मचारी तसेच ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. दरम्यान, दीपक फाऊंडेशन आणि दीपक नायट्राईट यांनी राबविलेल्या या आरोग्य विषयक कार्यक्रमाबद्दल यशवंतखार ग्रामस्थांनी धन्यवाद दिले आहेत.