महाविकास आघाडीचा निवडणूक आयोगाला इशारा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सदोष व दुबार नावे असलेली मतदार यादी दुरुस्त करा, अशी आग्रही मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने केली. मतदार याद्या दुरुस्त होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अन्यथा निवडणुकीला विरोध असेल, असा इशारा महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला दिला. राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी बुधवारी (दि.15) पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन मतदार यादी आणि बोगस नावावरुन आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर संवाद साधला. त्यानंतर, या सर्वच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रात सदोष व दुबार नावे असलेल्या मतदारयाद्यांच्या प्रश्नांबाबत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची बैठक निवडणूक निवडणूक आयोगासमवेत बुधवारी (दि.15) मुंबईत झाली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, माजी आ. बाळाराम पाटील, शिवसेना नेते संजय राऊत, अनिल देसाई, आदित्य ठाकरे, अनिल परब, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, प्रकाश रेड्डी, डॉ. अजित नवले, शैलेंद्र कांबळे, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आदी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रसे, शेकाप, मनसे, सीपी कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मतदारयादी सदोष व बनावट दुबार नावे असल्याचे पुरावे यावेळी निवडणूक आयोगाला दाखविण्यात आले. अनेकांची नावे डबल टाकण्यात आली आहेत. सदोष मतदार याद्यांमुळे गैरप्रकार चालत असल्याची माहिती देण्यात आली. मतदारयादी निर्दोष होऊन दुरुस्त होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली. सदोष मतदार यादीमुळे चुकीचे उमेदवार निवडून येतात. त्याची उदाहरणे यावेळी देण्यात आली. मतदान प्रक्रिया विश्वासाने होण्यासाठी व्हीव्ही पॅटचा वापर होणे गरजेचे आहे. तसेच बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने केली. सदोष मतदार याद्या दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
सदोष मतदार यांद्याबाबत निवडणूक आयोग यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत चर्चा झाली असून, प्राधान्याने सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन आयोगाकडून देण्यात आले आहे.
जयंत पाटील,
सरचिटणीस, शेकाप
इलेक्शन पेक्षा थेट सिलेक्शन करुन मोकळे व्हा : उद्धव ठाकरे
आम्ही सर्व जण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आलो आहोत. भाजपला निमंत्रण दिले आहे, पण ते आले नाहीत. जर मतदार याद्यांमध्येच घोळ आहे. या याद्या आम्ही घरी छापलेल्या नाहीत. लोकशाहीचा खेळ मांडला आहे. जर इलेक्शनपेक्षा थेट सिलेक्शन करुन मोकळे व्हा, असा टोला लगावत आता मतदार यादीतील घोळ संपेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेवू नका, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.
तोपर्यंत निवडणुका घेऊ नका - राज ठाकरे
5 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत, आता आणखी 6 महिने त्या झाल्या नाहीत तर काय फरक पडतो? मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगांच्या प्रतिनिधींना भेटलो. आज राज्य आणि केंद्री निवडणूक आयगाच्या प्रतिनिदीना भेटलो. निवडणूक म्हटलं की, राजकिय पक्ष आले मतदार आले.निवडणूक आयोग हे फक्त निवडणूक घेतात मात्र राजकिय पक्ष ते लढवतात. मात्र राजकिय पक्षांना निवडणूक आयोग यादया दाखवत नसेल तर इकडे घोळ आहे, असं राज ठाकरे म्हणाले. 2024 नंतर यादी जाहीर केली यात नाव आहेत फोटो नाही. दोघांना भेटलो हे आमच्यात येत नाही असं सांगतात. मतदार यादया न दाखवून काय भेटणार आहे? या मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणूका घेऊ नका, असं राज ठाकरेंनी सांगितले. 5 वर्ष निवडणूका झाल्या नाहीत, आणखी 6 महिने नाही झाल्या, तर काय फरक पडतो. उद्या-परवामध्ये काय निर्णय घेतात ते पाहू, नंतर सर्व आम्ही आमचा निर्णय सांगू, असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.
मतदार यादीत कुठलीही दुरुस्ती नाही- थोरात
निवडणूक आयोग सीईओ यांना आम्ही काल भेटलो, आज आयुक्तांना भेटलो. आम्ही आधीच सांगितलं होत की, मतदार याद्यांमध्ये दोष आहे. दोष असताना सुद्धा निवडणूक घेतली गेली, बाहेरून मतदार आले आणि मतदान केलं. विधानसभेच्या मतदार यादीमध्ये दोष होते. 1 जुलै रोजी मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केली, त्यामध्ये कुठलीही दुरुस्ती केली नाही. दोषासह ही यादी आता अंतिम केली, यावर राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांना भेटलो. मात्र, आम्ही जे विचारले त्यावरील उत्तराने आमचं समाधान झालेलं नाही, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.
पुराव्यासह बोगस मतदारांचा लेखाजोखा- जयंत पाटील
आम्ही कालच राज्याचे निवडणूक आयुक्त यांना भेटून निवेदन दिलं, मतदार यादीतील अनंत चुका दाखवल्या. सीओंनी आम्हाला आश्वासित केलं की, केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून दुरुस्त्या केल्या जातील. दोघांचे प्रश्न म्हणून आम्ही आजही भेट घेतली, काही महत्वाच्या पुरावे सहीत आम्ही माहिती दिली. पुराव्यांसोबत पत्रही दिली, मतदार यादीत मतदारांचे पत्ते चुकीचे







