आपली मानसिकता स्पष्ट असावी; पालकर

| पोलादपूर | प्रतिनिधी |
कोणत्याही वाईट अनुभवाला तात्काळ विरोध म्हणून केवळ ’नो’ म्हणजेच नकारार्थी प्रतिकार केला पाहिजे, तर चांगल्या उपक्रमांसाठी सर्वच क्षेत्रातून येस्स म्हणत सहकार्य करण्याची मानसिकता स्पष्ट झाली पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी व्यक्त केली. पोलादपूर तालुक्यातील चोळई येथील शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित सुंदरराव मोरे कला, विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.राम बरकुले यांनी सर्वांचे स्वागत केले. या प्रशिक्षण सत्राच्या प्रारंभी पोलादपूर येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते शैलेश पालकर यांनी, आणि असुरक्षेच्यावेळी विद्यार्थिनी स्वत:चे संरक्षण योग्य प्रकारे करू शकतील, यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनी हा लक्ष गट समोर ठेवून सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे नमूद केले.

यावेळी कार्यक्रमात प्रशिक्षक म्हणून मनोगत व्यक्त करताना युथ आयकॉन व राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय खेळाडू तपस्वी गोंधळी यांनी, विद्यार्थिनींना हिंसाचाराविरुध्द लढताना किंवा काळामध्ये स्वत:चे रक्षण करण्यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शन केले तसेच यावेळी त्यांनी विद्यार्थिनींना विविध व्यायाम प्रकार तसेच स्टेप्स यांच्याद्वारे स्वसंरक्षणाबाबत काही महत्त्वाच्या टिप्सही दिल्या.

Exit mobile version