| कोर्लई | वार्ताहर |
मुरुड दिवाणी व फौजदारी न्यायालय (क स्तर) व मुरुड तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायाधीश घनःश्याम तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली दि.27 जुलै रोजी लोकन्यायालय घेण्यात आले. यावेळी प्री लिटिगेशन असलेली एकूण 879 पैकी 32 प्रकरणे निकाली निघाली.
या लोकन्यायालयात बी. एस.एन. एल, महावितरण, बँक ऑफ इंडिया, मुरुड नगरपरिषद, पंचायत समिती, मुरुड न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा समावेश करण्यात आला होता. मुरुड नगरपरिषदेची पाणीपट्टी-घरपट्टी, पंचायत समितीची करवसुली, तसेच बँकांची कर्ज वसुली अशी एकुण रुपये 110480/- वसुल करण्यात आली. दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण 68 फौजदारी प्रकरणे व 06 दिवाणी प्रकरणे निकाली काढण्यात आली. लोकन्यायालयात पंच म्हणून अॅड. डी.एन. पाटील यांनी काम पाहिले. सहाय्यक सरकारी अभियोक्ता मिलिंद साळगावकर, अॅड. संजय जोशी, अॅड. एम.जे. तांबडकर, अॅड. हुसेन, अॅड. अजित चोगले, अॅड. कुणाल जैन, रेवदंडा पोलीस ठाण्याचे डी.डी. काकडे, मुरुड पोलीस ठाण्याचे डी.के. पाटील, सहाय्यक अधीक्षक शीला काठे, मतीन अधिकारी वरिष्ठ लिपीक व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
लोकन्यायालयात 879 पैकी 32 प्रकरणे निकाली
