। मुंबई । वृत्तसंस्था ।
यंदाच्या टी-20 विश्वचषकातील खराब खेळ माजी हिंदुस्थानी टी-20 कर्णधार विराट कोहलीला महाग पडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गुरुवारी पुन्हा जाहीर केलेल्या टी 20 रँकिंगमध्य विराटवर टॉप टेन फलंदाजांतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे.
पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम मात्र या प्रकारात टॉप टेन फलंदाज स्थानावर कायम राहिला आहे. भारताचा नवा टी-0 कर्णधार रोहित शर्मा दोन स्थाने वर जाऊन रँकिंगमध्ये 13 व्या क्रमांकावर विसावला आहे. कधी काळी टॉपवर असणार्या विराट कोहलीची मात्र फलंदाजी रँकिंगमध्ये थेट 11 व्या स्थानावर घसरण झाली आहे. न्यूझीलंड विरूद्धच्या टी-20 मालिकेतून आराम घेणारा विराट याआधी आठव्या स्थानावर होता. पण आता तो 11 व्या स्थानावर घसरला आहे