सुतारवाडीत भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

| सुतारवाडी | प्रतिनिधी |

सुतारवाडी तसेच ढोकळेवाडी, कुडली येथील नाक्यावर भटके श्वान रस्त्याच्या मधोमध येऊन उभी असतात. त्यातील काही श्वानांच्या शरीरावरची त्वचा अत्यंत खराब झालेली आहे. त्यामुळे त्यातील काही श्वान पिसाळलेल्या अवस्थेत दिसत आहेत. अशा श्वानांनी रस्त्यावरून जाणारा येणाऱ्या व्यक्तींना दश केला तर मोठा बागा प्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे. या परिसरामध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. तिथून लहान-मोठी मुल रस्त्याने ये-जा करत असतात. अशांना या भटक्या कुत्र्यांचा त्रास होऊ शकतो. अति वेगाने येणारे काही वाहन कधी कधी श्वानांना उडवून पोबारा करतात. त्यात मृत पावलेला श्वान त्याच ठिकाणी कुजत सडलेल्या अवस्थेत असतो. काही दिवसांनी या ठिकाणी दुर्गंधी पसरण्यास सुरुवात होते. या दुर्गंधीचा त्रास पादचारांना होत असतो. यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. मोकाट गुरांप्रमाणेच आता भटक्या कुत्र्यांचा ही नागरिकांना त्रास होत असतो. त्याचप्रमाणे वाहन चालकांना सुद्धा मोठी कसरत करून मार्ग काढावा लागत आहे.

Exit mobile version