जिल्ह्याच्या सर्वांगीण; विकासासाठी कटिबद्ध

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
नाविण्यपूर्ण उपक्रम, योजनांतून रायगड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री रायगड अदिती तटकरे यांनी रविवारी (1 मे) अलिबाग येथे केले. अलिबाग येथील पोलीस परेड मैदान येथे महाराष्ट्र दिनाच्या 62व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उप वनसंरक्षक आशिष ठाकरे आदींसह लोकप्रतिनिधी, अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा क्रीडा पुरस्काराने गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (कुस्ती) राजाराम बाजीराव कुंभार, गुणवंत खेळाडू (पुरुष) (वॉटरपोलो) भूषण गणपत पाटील, गुणवंत खेळाडू (महिला) (कुस्ती) कु.नेहा चंद्रकांत पाटील, गुणवंत खेळाडू (दिव्यांग) (कयाकिंग/कनोईंग) देविदास महादेव पाटील, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (मैदानी) गजानन तुकाराम भोईर, गुणवंत खेळाडू (पुरुष) (कुस्ती) दिवेश दत्तात्रय पालांडे, गुणवंत खेळाडू (महिला) (कबड्डी) कु.तेजा महादेव सपकाळ, गुणवंत खेळाडू (दिव्यांग) (मैदानी) विशाल विश्‍वनाथ जगताप यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेल बाबत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माजी शासकीय अभियोक्ता तथा भरोसा सेलच्या सदस्या ीला तुळपुळे, सखी सेंटर तथा भरोसा सेलच्या सदस्या गीता म्हात्रे यांनाही गौरविण्यात आले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे तृतीय वर्ष बी.एस.सी मायक्रोबायोलॉजी मध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनी व पी.एन.पी महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षदा दिलीप चेरफळे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय सुश्री जाकिया उमर कारभारी, महाड, सुश्री नजमा उमर कारभारी, महाड, सुश्री मेघना बाबूलाल वर्मा, पनवेल या तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्र वाटप करण्यात आले.
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नूतनीकरण झालेल्या नवीन जंजिरा सभागृहाचे उद्घाटनही संपन्न झाले. सूत्रसंचालन मानसी चेऊलकर व अजित हरवडे यांनी केले.

Exit mobile version