| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय महिला संघाने 2025 एकदिवसीय विश्व चषक जिंकून इतिहास रचला आहे. त्यामुळे क्रांती गौडच्या विश्व चषकातील कामगिरीमुळे तिच्या वडिलांची बंदी उठवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिले आहे. तसेच, क्रांतीच्या यशामुळे तिच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींवर मात करण्याची संधी मिळाली आहे.
जगज्जेत्या महिला भारतीय संघात 22 वर्षीय क्रांती गौडने मोलाचा वाटा उचलला. आता तिच्या या यशामुळे तिच्या कुटुंबातही मोठा आनंद पसरला आहे. तिच्या या यशामुळे तिच्या वडिलांवर लागलेली बंदी आता उठू शकते. क्रांतीचे कुटुंब मुळचे मध्य प्रदेशमधील बुंदेलखंड प्रदेशातील चंद्रपूर जिल्ह्यातील घुवारा गावचे आहे. ती विश्व चषक जिंकून घरी आल्यानंतर भोपाळमध्ये तिचे मध्य प्रदेशचे मुख्य मंत्री मोहन यादव यांनी एका कार्यक्रमात तिचा गौरव केला. यावेळी तिचे वडील मुन्ना सिंह गौड आणि निलम सिंह गौड, तसेच प्रशिक्षक राजीव बिथारे हे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री यादव यांनी आश्वासन दिले की, क्रांतीच्या वडिलांवर लागलेली बंदी उठवून त्यांना पुन्हा पदावर नियुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. 2011 मध्ये क्रांतीच्या वडिलांना पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्यात निष्काळजीपणाच्या आरोपाखाली चौकशीनंतर निलंबित करण्यात आले होते. परंतु, त्यांनी हे आरोप फेटाळले होते. या कारवाईनंतर त्यांच्या कुटुंबाला बऱ्याच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले होते.







