शिहूतील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

शिहू येथील भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रायगड जिल्हा रक्तपेढी, अलिबाग यांच्या सहकार्याने रविवारी (दि.19) डॉ. भोईर क्लिनिक, शिहू येथे आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात युवक, महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
या शिबिरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. “एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात“ हा संदेश देत आयोजकांनी रक्तदानाबाबत जनजागृती केली.

यावेळी उपस्थित उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी या सेवाभावी मानवता वादी उपक्रमाचे कौतुक केले. समाजातील प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असा संदेश यावेळी भोईर यांनी दिला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक व तालुक्यातील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले.

Exit mobile version