नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ऑक्सिनची आवश्यकता असणार्या रुग्णांचा पुरवठा पाच मिनिटांसाठी बंद केल्याचा दावा केला असून, कोण यामधून वाचू शकते, हे पाहण्यासाठी आपण हा प्रयोग केल्याचे रुग्णालयाच्या मालकाने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओतून दिसत आहे. ऑक्सिजन कमतरतेनं रुग्णांच्या मृत्यूचं ‘मॉकड्रिल’ करणार्या उत्तर प्रदेशातील आग्रा स्थित पारस रुग्णालयावर जिल्हाधिकार्यांकडून कारवाई करण्यात आली आहे. रुग्णालयाला सील करण्यात आले असून, संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 एप्रिल रोजी करण्यात आलेल्या या ‘मॉकड्रिल’दरम्यान 22 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेनं आग्र्यात एकच खळबळ उडाली होती.