पी. पी. खारपाटील संकुलनात परीक्षेला प्रारंभ

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील चिरनेर येथील पी. पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या विद्या संकुलनाच्या परीक्षा केंद्रात दहावी बोर्डाच्या परीक्षेला प्रारंभ झाला असून, मराठी भाषेचा पहिला पेपर सुरळीतपणे पार पडला. यावेळी पेपर सुरू होण्याआधी पालकांनीही गेटवर हजेरी लावली होती. याप्रसंगी शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

दहावीच्या परीक्षेसाठी चिरनेर केंद्रात शुक्रवारी पहिल्याच दिवशी असलेल्या मराठीच्या पेपरसाठी चिरनेर, मोठीजुई, दिघोडे येथील शाळेचे दहावीचे विद्यार्थी या चिरनेर केंद्रात दाखल झाले होते. 9 ब्लॉक मधून 214 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले असल्याची माहिती केंद्र संचालक नाथा नाईक आणि केंद्र उपसंचालक किशोर भोईर यांनी यावेळी दिली. दरम्यान परीक्षा अतिशय शांततेच्या वातावरणात सुरू झाली असून, पुढील पेपरही कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीतपणे पार पडतील अशी माहिती पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंगशेठ खारपाटील व उपाध्यक्ष राजेंद्रशेठ खारपाटील यांनी दिली. यावेळी परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थी वर्गाला पालक आणि शिक्षकवर्ग अनेक सूचना देताना दिसत होते.

Exit mobile version