। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताची प्रसिद्ध बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिचा विवाह 22 डिसेंबर रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे होणार आहे. सिंधू ही व्यंकट दत्ता साईशी लग्न करणार आहे. ते वरिष्ठ आयटी व्यावसायिक आणि पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहेत.
पी.व्ही. सिंधूचे वडील पी.व्ही. रमणा यांनी सांगितले की, दोन्ही कुटुंबे एकमेकांना आधीच ओळखत होते, परंतु एक महिन्यापूर्वीच लग्न ठरले आहे. त्यांनी पीटीआयला सांगितले की, सिंधूचे जानेवारीपासून बॅडमिंटनचे खूप व्यस्त वेळापत्रक असेल, त्यामुळे डिसेंबर लग्नाचा सर्वोत्तम काळ आहे. 22 डिसेंबरला उदयपूरमध्ये लग्न होणार आहे.
कोण आहे व्यंकट दत्ता साई?
व्यंकट दत्ता साई हे पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहेत. त्यांचे वडील जी.टी. व्यंकटेश्वर राव हे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि ते भारतीय महसूल सेवेत (आएरएस) अधिकारी आहेत. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात पी. व्ही. सिंधूने या कंपनीचा नवीन लोगो लॉन्च केला होता.