पाणी अडवा, पाणी जिरवा’ उपक्रम

वडगावकरांना मिळणार घरोघरी पाणी
हजारो लीटर पाण्याची होणार साठवण


| रसायनी | वार्ताहर |
नोव्होझाईम्स साऊथ एशिआ प्रायव्हेट लिमिटेड आणि अनार्डे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव ग्रामपंचायत हद्दीतील वडगाव गावाजवळच्या पाण्याच्या ओहोळावर पाटबंधारा आणि रिचार्ज शाफ्ट बांधून पाणी अडवा, पाणी जिरवा या उपक्रमाचे भूमिपूजन कंपनीचे संस्थापक संजय सूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर, सरपंच गौरी गडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्‍वनाथ खेडकर यांनी पाटबंधारे बांधून शेतकर्‍यांना लाभणार्‍या फायद्यांची माहिती दिली. तर, अनार्डे फाऊंडेशनचे पाणीपुरवठा विभागप्रमुख प्रसाद अंधेरे यांच्या म्हणण्यानुसार, वडगाव ओहोळावर ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ उपक्रमांतर्गत तीन करोड लीटर पाणी साठवणार असून, आसपासच्या विहिरींची पाणीपातळी ही वाढणार आहे. भविष्यात आसपासच्या शेती करणार्‍या शेतकर्‍यांना याचा फायदा होईल. यानंतर पाणी अडवा पाणी जिरवा या उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सरपंच गौरी गडगे यांनी अश्‍वनाथ खेडकर व संजय सूरसहित मॅनेजमेंट टीमचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. अनार्डे फाउंडेशन व नोव्होझाईम्स कंपनीने हाती घेतलेल्या कार्यक्रमाच्या, नोव्हेझाईम्स कंपनीने बोरिवली, धनगरवाडी, ठाकुरवाडी व साईनगर गावांमध्ये पूर्ण केलेल्या ‘वॉटरशेड मॅनेजमेंट व घरादारांस पाणी वितरीकरण या उपक्रमाबद्दल सरपंच गौरी गडगे यांनी आभार मानले.या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी नोव्होझाईम्स कंपनीचे संचालक संजय सूर व मॅनेजमेंट टीममधून सतीश सर्वोदय, संतोष राणे, वसंत ओक तसेच अनार्डे फाऊंडेशनचे प्रसाद अंधेरे, सुशांत, प्रताप आदींसह शेतकरी भारत जांभुळकर, शंकर फोफाडे, हनुमंत पाटील, रामदास जाधव, चंद्रकला आदी उपस्थित होते.

Exit mobile version