संगमेश्‍वरात कापलेली भात शेती पाण्यात


। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
संगमेश्‍वर तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपले असून सलग दुसर्‍या दिवशी वादळी वार्‍यासह आलेल्या पावसामुळे भातशेती आडवी झाली. भातशेतीत पाणी साचले असल्याने शेती संकटात सापडली आहे. पावसाबरोबरच वादळी वारा सुटत असल्याने तयार भातशेती आडवी होत आहे. कापणीला सुरूवात झाली असतानाच संगमेश्‍वर तालुक्यात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे पसवलेली भातशेती आडवी होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे.


गणेशोत्सवादरम्यान झालेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. संध्याकाळच्या दरम्यान पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. पुराच्या पाण्यामुळे भात शेती नष्ट होत असताना आता पावसामुळे पसवलेली भात शेती आडवी होत आहे. तसेच जंगली प्राण्यांचा त्रास शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. दोन दिवस संध्याकाळी वार्‍यासह आलेल्या मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले होते. सोमवारी संध्याकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतीमध्ये पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे कापलेले भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

Exit mobile version