श्रीवर्धन तालुक्यात लावणीची कामे पूर्ण

पावसाने दडी मारल्याने भातशेतीला धोका

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन तालुक्यामध्ये लावणीची शंभर टक्के कामे पूर्ण झाली आहेत. परंतु, पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील पाणी कमी झाले आहे. ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासूनच समुद्र देखील शांत झाला आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. श्रीवर्धन तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला आहे. जर तालुक्यात पाऊस अजून पडला नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. शेतकऱ्यांच्या लावण्या तर पूर्ण झाल्या आहेत. परंतु, शेतात पाणी नसल्यामुळे खत मारू शकत नाही. ज्या वेळेला भरपूर पाऊस पडेल शेतात थोडं पाणी होईल. त्या वेळेलाच भाताला खत लावता येते.

यावर्षी पावसाने उशिरा सुरुवात केली असली तरी पण, भाताची लागवड चांगल्या प्रमाणात रुजली होती व लावणीच्या वेळी देखील योग्य प्रमाणात पाऊस पडत होता. परंतु, लावण्या पूर्ण झाल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे हवेमध्ये उष्म्याचे प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हवेतील सापेक्ष आर्द्रता वाढत असल्यामुळे घाम येण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. परंतु, भात शेतीला पाऊस न पडणे हे धोकादायक आहे.

आतापर्यंत निसर्गान दिलेली चांगली साथ अशीच भात कापणी पर्यंत देत राहो अशी प्रांजळ इच्छा व्यक्त करुन यावर्षी चांगले पीक हाती लागेल अशी आशा शेतकऱ्याला हिरवेगार सर्वत्र फुललेले धरतीवरील वातावरण पाहून वाटत आहे. शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात भात शेतीचे पीक घेतले जाते. सध्या मघा नक्षत्र चालू असून त्याचे वाहन मोर आहे. वाहन मोर असल्यानंतर पाऊस बऱ्यापैकी पडतो. परंतु, मघा नक्षत्रामध्ये पाऊस अत्यल्प झाला आहे. 30 ऑगस्ट रोजी पुरवा फाल्गुनी नक्षत्र निघणार असून त्याचे वाहन गाढव आहे. पर्यायाने या वेळेला देखील कमी पावसाची शक्यता असते. 13 सप्टेंबर रोजी उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सुरू होणार असून, गणेशोत्सवाच्या एक दिवस अगोदर हे नक्षत्र निघणार आहे. याचे वाहन बेडूक असल्यामुळे यावेळी भरपूर पाऊस पडेल. असा अंदाज वर्तवण्यात येतो. मात्र, सध्याची पावसाची परिस्थिती पाहता एल निनोचा प्रभाव असल्याचे पाहायला मिळते.

शेतकरी सुखावला
सुवर्णा, गुजराती कोलम, ओवा, मसुरी कोलम आदी पिकांची पेरणी केली जाते. दरवर्षी पेरणीच्या वेळेस पावसाचे आगमन होऊन पुन्हा सात, आठ दिवस पाऊस गायब होत असतो. मात्र यावर्षी थोडा अशीरा दाखल झालेला मान्सून समाधानकारक संततधार पडत राहिल्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.
Exit mobile version