। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पद्मश्री डॉ दत्तात्रेय नारायण तथ आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण निरुपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांचा युरोपियन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट पॅरिस, फ्रांस यांच्यावतीने लिव्हिंग लेजंड आणि मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. त्यामुळे श्री सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर जनरल डॉ. एडव्हर्ट रॉय, डॉ. चांग यान लँग, टीना यँग, डॉ रॉबर्ट ब्रँड आणि डॉ. आर परमेश्वर, डॉ अजय देसाई उपस्थित होते. या पदवीबरोबरच फेम टाईम इंटरनॅशनल ग्लोबल लिडरशीप अवॉर्डने सचिनदादा धर्माधिकारी यांना सन्मानित करण्यात आले. बँकाक-थायलंड येथे पंचतारांकित हॉटेल रेनिसन्स येथे पार पडला. डॉक्टरेट पदवी व आंतरराष्ट्रीय मानाचा पुरस्कार प्रदान होताच महाराष्ट्रभर श्री सदस्यांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील कुटुंब धर्माधिकारी कुटुंबियांनी गेली 75 वर्षे केलेल्या अध्यात्मिक- सामाजिक कार्यामुळे या कुटुंबातील सलग तीन पिढ्यांनी मानद डॉक्टरेट पदवी मिळवण्याची ऐतिहासिक हॅट्ट्रिक साधली आहे. सचिनदादा धर्माधिकारी हे धर्माधिकारी कुटुंबातील तिसर्या पिढीचे नायक आहेत. या कार्यक्रमात ‘पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी’ यांना लिवींग लिजेंड म्हणून गौरवण्यात आले. धर्माधिकारी या कुटुंबातील सलग तीन पिढ्यांनी मानद डॉक्टरेट पदवी मिळवण्याची ऐतिहासिक हॅट्ट्रिक साधली आहे. जगभरातील कोट्यवधी श्रीसदस्यांना श्रवण-मनन-निजध्यासाच्या माध्यमातून सुख-शांती- समाधान मिळवून देण्याचे महान कार्य करणार्या या धर्माधिकारी कुटुंबातील तिन्ही पिढ्यांना श्रीसदस्यांच्यावतीने मोठ्या प्रमाणात आदर दिला जात आहे. रायगडवासियांसाठी हा मानाचा मुजरा असल्याचे नागरिक सांगत आहेत.