शिवप्रेमींकडून स्वच्छता, संवर्धन; शेकडो तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण सामाजिक संस्थांच्या वतीने शनिवारी (दि.13) शेकडोच्या संख्येने बोटीतुन पद्मदुर्ग किल्ल्यात बोटीने आगमन केले. प्रथम शिवप्रेमींनी दुर्गादेवी कोटेश्वरी मातेची पुजा केली. त्यानंतर गडाचे पूजन करुन स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर संभाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हर हर महादेव’ अशा घोषणा देत स्वच्छता मोहीमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी तरुणींनी स्वच्छता सहभाग नोंदवुन महाराजांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण सामाजिक संस्था मुरुड अध्यक्ष आशिलकुमार ठाकूर, उपाध्यक्ष राहुल दत्तात्रेय कासार, सचिव महेंद्र मोहिते, सल्लागार विजय वाणी, पुजा बेडेकर, संजना पाटील, अंकिता कमाने, रुपेश जामकर, योगेश सुर्वे, महेश साळुंखे, सतेज विरकूड, अच्युत चव्हाण, बाबू घरत, सुनील शेळके, मिलिंद भगत, अविनाश भगत, संदेश म्हात्रे, प्रकाश चव्हाण, प्रकाश वाडकर, अमित पाटील, प्रमोद मसाल, नेहा पाके, खार अंबोली गडप्रेमी ग्रुप, विहूरचे गडप्रेमी, रामराजचे गडप्रेमी इत्यादी शिवप्रेमी उपस्थित होते.
यावेळी पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण सामाजिक संस्था मुरुड अध्यक्ष आशिलकुमार ठाकूर यांनी स्वच्छता मोहीमत सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले होते.
या आवाहनाला शिवप्रेमीनी चांगला प्रतिसाद देऊन कोयता, झाडू, पारय, पंजा, टिकाव, फावडे इत्यादी साहित्य घेऊन किल्ला स्वच्छतेला सुरुवात केली. गडावरील तोफा स्वच्छता करण्यात आल्या. गडावरील मोठ मोठी झाडे तोडण्यात आली. तुटलेल्या दगडी पायऱ्या बसविणे, गवत काढण्यात आले. बॉटल, प्लॉस्टीक पिशव्या आदिंसह वस्तू उचलण्यात आल्या. तसेच सुके गवत एक जागी नेऊन जाळण्यात आले. तद्नंतर सर्व शिवप्रेमींनी राजे शिवछत्रपती महाराजांना मानवंदना देण्यात आली.
संवर्धन, जतनाअभावी किल्ल्याची दैन्यावस्था
350 वर्षापुर्वी उन्मत्त झालेल्या सिद्दीला नामोहरम करण्यासाठी छत्रपती शिवराय व शंभुराजे आणि जिगरबाज मावळ्यांनी मुरुड समुद्रकिनारापासून तीन किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात राजे शिवछत्रपती महाराजांनी पद्मदुर्ग किल्लाची निर्मिती केली. तद्नंतर सरकारने हा किल्ला ताब्यात घेऊन पुरातत्व विभागाकडे संवर्धन व जतन देण्यात आला. परंतु, अजुनपर्यंत कोणात्याही सरकाराने या किल्ल्याचे संवर्धन व जतनही केले नाही. यामुळे किल्ल्याची दैन्यावस्था झाली.







