| आगरदांडा | प्रतिनिधी |
पद्मदुर्ग जागर व गड संवर्धन संस्था मुरुड व कोकण कडा मित्र मंडळ रायगड सर्व संलग्न शिवप्रेमी संस्था यांच्यावतीने पद्मदुर्ग जागर सोहळ्याचे आयोजन रविवार दि. 5 जानेवारी रोजी करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यासह जिल्ह्याचे खासदार, आमदार यांची प्रमुख उपस्थिती संपन्न होणार आहे. यानिमित्त पुरातत्व विभाग मुरुड बजरंग एरिकर, बंदर निरीक्षक मुरुड प्रमोद राऊळ, तहसीलदार रोहन शिंदे, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, मुख्याधिकारी मुरुड जंजिरा नगरपरिषद सचिन बच्चाव, पौरोहित्य प्रकाश जंगम, कोकण कडा मित्र मंडळ सदस्य शेखर फरमन, पद्मदुर्ग जागर व गड संवर्धन सामाजिक संस्था, मुरुडचे उपाध्यक्ष राहुल कासार, कोकण कडा मित्र मंडळ रायगड उपाध्यक्ष संकेत वडके यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
रविवारी सकाळी 6 वाजता मुरुड राधाकृष्ण मंदिराजवळील समुद्र मार्ग बोटीतून पद्मदुर्ग किल्ल्यात पालखी प्रस्थान, सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत गड सजावट, सकाळी 10 वाजता गडदेवता पूजन, सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व्याख्यान, शिवपालखी सोहळा, मर्दानी खेळ, दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत महाप्रसाद, दुपारी 2 वाजता पद्मदुर्ग ते बोटीतून प्रस्थान मुरुडकडे प्रस्थान होणार आहे. तरी, दुर्ग शिवरायांचा आपल्या स्वाभिमानाचा एक दिवस इतिहासाचा साक्षी होण्यासाठी शिवप्रेमींनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन पद्मदुर्ग जागर व गड संवर्धन सामाजिक संस्था, मुरुडचे अध्यक्ष आशिलकुमार ठाकुर व कोकण कडा मित्र मंडळ रायगड अध्यक्ष सुरेश पवार यांनी केले. तसेच शिवप्रेमींना किल्ल्यात जाण्यासाठी व येण्यासाठी बोटीची व्यवस्था खोरा बंदर, डोंगरी, मुरुड येथून करण्यात आली आहे.







