ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी लिलावती रुग्णालयात दाखल

। मुंबई । प्रतिनिधी ।
देशाचे स्वच्छतादूत, पद्मश्री, ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नियमीत तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती खणखणीत असून, काळजी करण्यासारखे काही नाही. रुटीन चेकअप सुरु असताना तपासण्यांना उशिर होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरू आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीही तातडीने त्यांना भेटण्यासाठी लिवावती रुग्णालयात पोहोचले आहेत.

समर्थ रामदासांच्या दासबोधाच्या निरूपणाचा वारसा वडील डॉ. नारायण विष्णू उर्फ नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून घेऊन तो समर्थ बैठकांच्या माध्यमातून अधिक प्रभावी करण्याचे आणि त्याला सामाजिक परिवर्तनाचा आधुनिक आयाम देण्याचे अनन्यसाधारण काम पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत.

अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन आणि व्यसनमुक्ती या क्षेत्रांत त्यांनी प्रभावीपणे प्रबोधनाचे काम केले. योग्य वेळी भविष्याचा वेध घेत मानववंशाच्या हितासाठी पर्यावरण संवर्धनाच्या विचाराला प्राधान्य दिले. देश-परदेशातील हजारो बैठकांच्या माध्यमातून लाखो अनुयायांच्या मनात तो विचार शास्त्रशुद्ध पद्धतीने रुजविण्यात आप्पासाहेबांनी निरुपणातून यश संपादन केले आहे. अलीकडच्या काळातील मोठ्या सामाजिक परिवर्तनाच्या यशस्वी चळवळीचे प्रत्यंतर देणारे असेच आहे. धर्माधिकारी घराण्यात चारशे वर्षांपासून समाजप्रबोधनाच्या कार्याची परंपरा आहे.

Exit mobile version