। उरण । वार्ताहर ।
स्वामी नरेंद्राचार्य महाराज दक्षिणपिठ नाणीजधाम यांचा पादुका दर्शन सोहळा पनवेल तालुक्यातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सेक्टर 16 ए, उलवे नोड, येथे सोमवारी (दि.12) सकाळी 10 पासून सुरु होणार आहे. पादुकांसमवेत गुरुपुजनाचा, उपासक दिक्षेचा, प्रवचनाचा व दर्शनाचा लाभ उपस्थित भाविक भक्तांना व हितचिंतकांना मिळणार आहे. तसेच या दिवशी हजारो भक्तगण उपासक दीक्षा घेणार असून संस्थानच्या सामाजिक उपक्रमांतर्गत गरीब आणि गरजू महिलांना मोफत घरघंटी वाटप करण्यात येणार आहेत.