। चणेरा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील साईदत्त सेवा संस्थान 2007 रोजी स्थापन झाले असून न्हावे ते श्री क्षेत्र शिर्डी या पदयात्रेला 18 वे वर्षे झाली आहेत. दरवर्षी प्रमाणे दत्त जयंतीनिमित्त रवाना झालेली पदयात्रा 13 डिसेंबर रोजी श्री क्षेत्र शिर्डी येथे पोहचणार आहे. दरम्यान, ही पदयात्रा भजन व साईबाबांच्या नामाच्या गजरात न्हावे येथून प्रस्थान झाली. या पदयात्रेला रोहा तसेच मुरुड तालुक्यातील 140 साईसेवक सहभागी झाले. या विभागातील मानाची आणि प्रतिष्ठेची साई पालखी असून यामध्ये साई सेवाकांबरोबर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहभाग घेऊन आनंदाने व उत्साहाने साईसेवा करत शिर्डी येथे प्रस्थान केले आहे. पदयात्रेचे संस्थापक प्रमोद कासकर, अध्यक्ष साईली कासकर, कार्याध्यक्ष मारुती सर्लेकर व विजयकुमार कासकर, सल्लागार परेश म्हात्रे, राहुल पोकळे, प्रदिप पोकळे, शशी डोलकर, राम पाटील, मनोज भायतांडेल, रामनाम भायतांडेल, सत्यप्रसाद आडाव, विलास कासकर तसेच अन्य पदाधिकारी व साई सेवक यांच्या योग्य नियोजनातून पदयात्रा पुर्णतेला जात असते.