ओम साई मंडळातर्फे पायी पालखी

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील अध्यात्मिकतेचा व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चिरनेर गावातील ओम साई सेवा मंडळातर्फे सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील गुरुपौर्णिमेनिमित्त चिरनेर ते साईमंदिर वहाळ पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ओम साई सेवा मंडळ चिरनेरतर्फे गेल्या बारा वर्षांपासून मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली साईंच्या पायी पालखी दिंडीचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ही बारावी पदयात्रा असून, रविवारी पायी पालखी दिंडीचा शुभारंभ चिरनेर येथील श्री महागणपती मंदिरातून श्रींची महाआरती करून करण्यात आला.

याप्रसंगी चिरनेरचे उद्योगपती राजेंद्र खारपाटील, सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, पोलीस पाटील संजय पाटील, चिरनेर तंटामुक्तीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, ज्येष्ठ दिग्दर्शक वसंत चिर्लेकर, दिग्दर्शक संतोष ठाकूर, ग्राहक मंचाचे शशांक ठाकूर, वारकरी दत्ता मोकल, समीर डुंगीकर, निकिता नारंगीकर, उद्योजक घनश्याम पाटील यांच्यासह चिरनेर ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी कार्याध्यक्ष गजानन फुंडेकर, सल्लागार बबन ठाकूर, सल्लागार हरिश्‍चंद्र मोकल, सल्लागार गजानन म्हात्रे, सल्लागार रमेश म्हात्रे, अध्यक्ष अमित मुंबईकर, उपाध्यक्ष नितीन नारंगीकर, सचिव संतोष चिर्लेकर खजिनदार प्रसाद पाटील या सर्व पदाधिकार्‍यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. दरम्यान, पालखी दिंडी रांजणपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रस्थान झाल्यानंतर ओम साई सेवा मंडळाकडून साई भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पायी पालखी दिंडीचे साई मंदिर वहाळकडे प्रस्थान झाले. वहाळ साई संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी साई भक्तांचे स्वागत केले. साईंचा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी ओम साई सेवा मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version