। नेरळ । प्रतिनिधी ।
पुरस्कार सोहळ्यासाठी अमेरिकेत गेलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार पराग बोरसे यांच्यावर अमेरिकेतील चित्रकार देखील फिदा आहेत. तेथील मराठी भाषिक चित्रकार यांनी पराग बोरसे यांना चित्रकलेचे धडे देण्याची विनंती केली. त्यानंतर बोरसे यांनी अमेरिकेतील मराठी चित्रकारांना चित्रकलेचे धडे दिले.
भारतीय कलाकार पराग बोरसे यांना अमेरिकेतील अनेक सन्माननीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आह. न्यू जर्सीच्या पेस्टल सोसायटीने रोजी मेडिसन हाऊस, 25, कुक एव्हेन्यू, मेडिसन, न्यू जर्सी येथे एका पेस्टल पोर्ट्रेट कार्यशाळेसाठी पराग बोरसे यांना आमंत्रित केले होते. मराठी भाषिक अमेरिकास्थित 14 विद्यार्थ्यांनी चित्रप्रक्रिया समजून घेण्यासाठी आणि शिकण्यासाठी भाग घेतला होता. पराग बोरसे यांनी लाल रंगाचा पगडी परिधान केलेल्या आणि मोठ्या मिशा आणि दाढी असलेल्या महाराष्ट्रातील एका गावकर्याच्या चित्राचे प्रात्यक्षिक दिले आहे. सर्व विद्यार्थी खूप प्रभावित झाले आहेत.त्यांच्याकडून भविष्यात देखील भारतीय संस्कृतीबद्दल अधिक जाणून घेण्यास उत्सुक असल्याचे दिसून आले.