हातमागावरूनच लाखोंच्या पैठण्यांची चोरी

। नाशिक । प्रतिनिधी ।

नाशिकमधील पैठणी कारखान्यात सोमवारी (दि. 26) चोरी झाल्याची घटना घडली आहे. यात चोरांनी लाखो रुपये किमतीच्या पैठण्या चोरून नेल्या आहेत.

नाशिकमधील येवल्याजवळ सर्वात महागड्या पैठणी तयार करणारा गायकवाड यांचा कारखाना आहे. या कारखान्यात सुमारे तीन लाख रुपये किमतीच्या साड्या हातमागावर विणल्या जात होत्या. गेल्या वर्षभरापासून या बहुमोल पैठणीवर कामरागीर धागा धागा विणत बहुमोल पैठणी तयार करत होते. या साड्यांवर आता फक्त अखेरचा हात फिरणं बाकी असताना सोमवारी मध्यरात्री चोर कारखान्यात शिरले आणि त्यांनी सुमारे तीन लाख रुपये किमतीच्या पैठणी साड्या चोरून नेल्या. याबाबत येवला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version