पाक कर्णधाराचा विश्‍वविक्रम

139 चेंडूत 158 धावा
| एजबॅस्टन | वृत्तसंस्था |
पाकिस्तानचा कर्णधार आणि फलंदाज बाबर आजमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा विश्‍वविक्रम केला आहे. या जागतिक विक्रमातून बाबर आझमने हाशिम अमलाचा विक्रम मोडत भारताचा कर्णधार विराट कोहलीसारख्या दिग्गजांना मागे सोडले आहे. आझमने 139 चेंडूत 158 धावा केल्या. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना आश्‍चर्यचकित केले होते. दोन्ही फलंदाजांनी 179 धावांची विक्रमी भागीदारी केली. या दरम्यान मोहम्मद रिझवानने 58 चेंडूत 76 धावांची तुफानी खेळी खेळली, तर बाबर आझमनेही 14 वे शतक पूर्ण केले.

एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने विक्रम मोडणारे शतक ठोकले. आझमने 139 चेंडूत 158 धावा केल्या आणि अनेक जुने विक्रम मोडले. तसेच अनेक नवीन विक्रम देखील नोंदवले. या डावाच्या जोरावर बाबर आझमने चार मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या सामन्यात शतक पूर्ण करत बाबर आझमने वनडेमध्ये सर्वाधिक धावा केल्या. पाकिस्तानकडून एकदिवसीय सामन्यात आणि कर्णधार म्हणून सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रमही त्याने आहे. इंग्लंडविरुद्ध कोणत्याही सामन्यात कर्णधाराकडून इतक्या धावा केल्या नव्हत्या त्यामुळे हा सुद्धा विक्रम त्याच्या नावावर झाला.

Exit mobile version