। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय क्रिकेट संघाने टी-20 विश्वचषकात चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. 24 जून रोजी एका रोमहर्षक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. विश्वचषकातील भारताची चमकदार कामगिरी पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंना आवडलेली नाही. यामुळेच भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर पाकिस्तानचे दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी कर्णधाराने भारतीय संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला होता. पाकिस्तान क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक आणि संघाचा माजी कर्णधार इंझमाम उल हक याने भारतीय संघावर खळबळजनक आरोप केला आहे. इंझमामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजी करताना भारतीय संघावर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला होता.







