पाकला भारताच्या मदतीची गरज

एकमेकांचे कट्टर वैरी देखील कठिण समयी मित्र बनू शकतात. भारत पाकिस्तानच्या क्रिकटेपटूंना; विशेषतः पाकिस्तानच्या क्रिकटेपटूंना तरी आज असंच वाटतंय. निमित्त आहे टवेन्टी-20 विश्‍वचषक क्रिकटे स्पर्धेचे स्थळ पर्थचे क्राऊन हॉटेल. क्रिकटेच्या इतिहासात असं अगदीच क्वाचितच घडलं की, भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेटपटू एकाच हॉटेलात वास्तव्य करत आहेत. आज मात्र या दोन हाडवैर्‍यांमधील भावना वेगळीच देहबोली सांगत होती. ऐरवी सामना असला की एकमेकांची तोंडेही न पाहणारे उभय संघाचे खेळाडू आज मात्र हॉटेलमध्ये एकच गप्पा मारताना दिसत होते.

अर्थातच गप्पांचा विषय होता उद्या रविवारी पर्थला होणार्‍या दोन्ही संघांच्या क्रिकटे सामन्याचा पाकिस्तानचे 1992 ला ऑस्ट्रेलियात 50-50 षटकांत विश्‍वचषक जिंकला होता. त्यावेळी मला आठवतंय, इम्रानखानने अंतिम सामान्याच्य पूर्वंसंध्येला, मेलबर्न स्टेडियमवर उपस्थित राहणार्‍या तमाम भारतीयांना आवाहन केले होते की, आम्हाला साथ द्या सपोर्ट करा, प्रोत्साहन द्या! अस बाबर आझमच्या पाकिस्तान संघावर चक्क भारतीय संघालाच मिनतवादी करण्याची वेळ आली आहे. पर्थच्या हॉटेल क्राऊनमध्ये आणि दोन्ही संघांचे खेळाडू मुक्तपणे बोलताना दिसले. आतापर्यंत असं फार वेळा पहायला मिळाले नव्हते. पाकिस्तान संघ उद्या पर्थला नेदरलँड विरूद्ध दोन हात करणार आहे. त्यानंतर याच स्टेडियमवर उद्या ‘ब’ गटातील आणखी दोन संघांत म्हणजे, भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांत लढत होणार आहे.

पाकिस्तानला उद्याच्या सामन्यात भारत जिंकायला नको आहे. तरच त्यांचे आव्हान जिवंत राहणार आहे. मात्र पाकिस्तानला उर्वदित तिन्ही लढती जिंकून कैद्यांसह अन्य प्रबळ प्रतिस्पर्धांपैकी कोवा पराभूत होतो याची प्रतिक्षा करावी लागेल.

भारताविरूद्ध लढतीत दक्षिण आफ्रिकेने एक वेगवान गोलंदाज खेळविण्याची योजना आखली आहे. अलीकडेच भारताविरूद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळल्यामुळे त्यांच्या गाठीशी अनुभव आहे. मात्र भारतीय संघ सध्या अधिक आत्मविश्‍वासाने खेळत असल्याने दक्षिण आफ्रिकेलाही उद्याची लढत सोपी नाही. विशेषतः भारताच्या माजी कॅप्टन व प्रमुख फलंदाज विराट कोहली याला फलंदाजीचा सूर गवसल्याने त्यांच्यापुढे प्रखर आव्हान उभे ठाकले आहे.

विराट कोहलीने या विश्‍वचषकात खेळलेल्या दोन्ही सामन्यात नाबाद अर्धशतके ठोकली आहेत. त्यामुळे विराट कोहलीला बाद कसे करायचे यासाठी जगातील अनेक मान्यवर गोलंदाज यांच्यात सध्या चर्चा सत्र रंगायला लागल आहेत. त्यामध्ये काही विद्यमान प्रशिक्षकही आहेत.

मागे विराट कोहलीच्या फॉर्म गेल्यानंतर बीसीसीआयच्या बॅटिंग अ‍ॅकॅडमीत मुंबईत कोहली सराव करायचा. त्यावेळी तेथील प्रशिक्षक लालचंद राजपूत यांनी त्याला यॉर्करची चिंता न करता खेळ असे सांगितले होते. कारण अ‍ॅन्डरसनचा यॉर्कर पडेल आणि माझी त्रिफळा उडेल असे कोहलीला सारखे वाटायचे आणि यॉर्कर खेळण्याच्या प्रयत्नात कोहली अ‍ॅन्डरसनच्या आऊट स्वींगला बॅट लावायचा आणि यष्टीपाठी झेलबाद व्हायचा. यॉर्करचा फोबिया गेल्यानंतर आपण बदललेला कोहली पाहिला होता.

इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज अ‍ॅलन मुलार्ली ऑस्ट्रोलियातच स्थायिक झाले आहेत. एकेकाळी इंग्लंडच्या प्रमुख प्रतिस्पर्धा ऑस्ट्रेलियाच्या मध्यल्या फळीला नेस्तनाबूत करण्याचे काम मुलार्ली यांनी केले होते. अ‍ॅलन मुलार्ली यांना वाटते कोहलीसारख्या कसलेल्या व सध्या फॉर्मात असलेल्या फलंदाजाला याच्या यॉर्करच बाद करू शकेल. पूर्ण वेगात यॉर्कर टाकत रहा आणि मध्येच वेगात बाऊन्सर मारा. मुलार्ली म्हणत होते, मी गोलंदाजी करीत असतो तर कोहलीला सतत वेगाने चेंडू खेळायला लावल असते व त्याच्या आत्मविश्‍वास संपवित गेलो असतो.

मुलार्ली यांच्या मते त्यांनी सामना केलेल्या फलंदाजांमध्ये सर्वात धोकादायक फलंदाज दोनच होते. एक विंडिजचा ब्राऊन लारा आणि दुसरा भारताचा सचिन तेंडुलकर. या दोघातही तेंडुलकरला बाद करणे अवघड होते. कारण तो बचाव भक्कम ठेऊनच धावा काढत असतो. आज तरी विराटला बाद करण्याची समस्या प्रमुख संघांना भेडसावित आहे. उद्या दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज मुलार्लीचा सल्ला ऐकतात का ते पाहुया!

Exit mobile version