पाकिस्तान विश्‍वचषकला गवसणी घालणार

कर्णधार बाबर आझमचा दावा

| कराची | वृत्तसंस्था |

भारतामध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर यादरम्यान आयोजित करण्यात येणार्‍या एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेत आम्ही फक्त भारताविरुद्धच्या लढतीवर लक्ष केंद्रित केले नसून प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील सर्व लढती जिंकून विश्‍वकरंडकाच्या जेतेपदाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याने विश्‍वासाने सांगितले. बाबर आझमने श्रीलंकन मालिकेसाठी रवाना होण्याआधी पत्रकार परिषदेत विविध प्रश्‍नांना उत्तरे दिली. पाकिस्तान क्रिकेट मंडळात उलथापालथ झाली आहे. याबाबत बाबर आझम म्हणाला, पाकिस्तान क्रिकेट मंडळात सध्या काय घडले आहे याकडे आम्ही लक्ष देत नाही. आमचे लक्ष फक्त क्रिकेटवर असणार आहे. असे त्याने स्पष्ट केले.

आमच्यासमोर सर्व सामन्यांचे वेळापत्रक आहे. व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून जिंकण्यासाठी काय करायला हवे. याची माहिती आम्हाला आहे, असेही बाबर आझम स्पष्ट सांगतो. भारतामध्ये विश्‍वकरंडक असल्यामुळे दबाव असणार का, असा प्रश्‍न करण्यात आल्यानंतर बाबर आझम म्हणाला, विश्‍वकरंडक कोणत्याही देशामध्ये असला तरी आम्हाला त्यामध्ये सहभागी व्हावे लागते.

बाबर आझम, कर्णधार
Exit mobile version