| लाहोर | वृत्तसंस्था |
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात मोठी घोषणा केली आहे. पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तीन ठिकाणांची निवड केली आहे. पीसीबीने ही तिन्ही ठिकाणे यादी आयसीसीकडे पाठवली आहे. लाहोर, कराची आणि रावळपिंडी ही तीन ठिकाणे आहेत. वृत्तानुसार, भारताचे सामनेही येथे ठरले आहेत. आता पाकिस्तानच्या या घोषणेनंतर बीसीसीआयकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहायचे आहे.
खंरतर यावेळी पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवत आहे. पण भारतीय संघ तिथे खेळायला जाणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आशिया कपचे यजमानपदही पाकिस्तानलाच दिले होते, पण त्यानंतर भारतीय संघाने तेथे खेळण्यास नकार दिला. आणि त्यानंतर पाकिस्तानला भारताचे सामने श्रीलंकेत आयोजित करावे लागले होते.