| मुंबई | प्रतिनिधी |
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या पलाश मापारा याने आपली विजयी घोडदौड कायम राखताना तिसऱ्या अखिल भारतीय बुद्धिबळ मास्टर्स स्पर्धेत एकहाती आघाडी मिळविली. पलाशने सर्वाधिक 5 गुणांसह महत्त्वपूर्ण आघाडी घेत आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर दडपण आणले.
पेडर रोड येथील मुंबई चेस सेंटर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत काळ्या मोहऱ्यांनी खेळताना पलाशने अप्रतिम चाली रचल्या. त्याने शांतपणे खेळताना पुनित डोडिया (4 गुण) याचा पराभव केला. सलग चार सामने जिंकलेल्या पुनितच्या मोहिमेला यामुळे जबर धक्का बसला. श्रीराम म्हसाणे, प्रतीक यादनिक, यशराज राठी, एजीएम राजवीर नहर आणि श्रेयांश सोमैया हे पाच खेळाडू प्रत्येकी 4.5 गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. दुसऱ्या पटावर यशराज राठी आणि प्रतीक यादनिक यांच्यातील सामना बरोबरीत सुटला. श्रेयांश आणि राजवीर नाहर यांनी काळ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रभावी विजय मिळवले. श्रेयांशने तिसऱ्या पटावर अहान कटरूका (3.5 गुण) याचा पराभव केला.
पलाशचा सलग सहावा विजय
