| पाली | वार्ताहर |
सुधागड तालुका कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने बल्लाळेश्वर मित्र मंडळ पाली यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. 7 क्रीडा संकुल पाली येथे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेतील अंतिम लढत ओम कालभैरव आपटवणे विरुद्ध भैरिनाथ क्रीडा मंडळ वावे या दोन संघात झाली. या स्पर्धेत आपटवणे हा संघ विजयी झाला. या संघास रोख रक्कम 11 हजार 1 रु. व चषक, तर उपविजेतापदाचा मानकरी वावे संघास रोख रक्कम 7 हजार 1 रु. व चषक, तृतीय क्रमांक नागशेत संघास रोख रक्कम 5 हजार 1 रु. व चषक, चतुर्थ क्रमांक चिवे संघास रोख रक्कम 5 हजार 1 रु. व चषक देऊन मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू समाधान मोरे (आपटवणे), उत्कृष्ट चढाई स्वप्नील भिलारे (चिवे), उत्कृष्ट पक्कड जयेश खाडे (रासळ), पब्लिक हिरो मयुरेश पोंगडे (नागशेत) या खेळाडूंना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.