पाली नगरपंचायत पोटनिवडणूक

भाजप-शिवसेना (शिंदे गट) आमनेसामने

| सुधागड-पाली | वार्ताहर |

पाली नगरपंचायतीतील रिक्त झालेल्या नगरसेवक पदासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून, या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) उमेदवार आमनेसामने आहेत. यांच्यात सरळ दुरंगी लढत होत आहे. त्यामुळे राज्यात दुरंगी लढतीची चर्चा सध्या पालीत सुरू आहे.

पाली नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवारांना अधिकृतपणे एबी फॉर्म देऊन भाजपा व शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षानी दंड थोपटले आहेत.पाली नगरपंचायतीच्या वॉर्ड क्र. 10 च्या रिक्त झालेल्या नगरसेवकपदासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून, भाजप व शिवसेना (शिंदे गट) हे मित्र पक्ष असणारे आज हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या समोर निवडणुकीच्या मैदानात उभे राहिले आहेत. केंद्र व राज्यात एकत्रित सत्तेत असतानाही भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांनी मात्र नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी एकमेकांविरोधात लढण्याची तयारी केली आहे. भाजप व शिवसेनेमध्येच दुरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुरंगी लढत झाल्यास त्याचा कोणाला फटका बसेल, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिवाय, स्थानिक पातळीवर वेगळी गणिते जमताना दिसत आहेत.

दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना (शिंदे गट) व आणि भाजप या दोन पक्षानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) खांद्याला खांद्या लावून काम केले असल्याने पाली नगरपंचायती पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित (पवार गट) पक्ष कोणाला कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version