पाली नगरपंचायत निवडणूक; मनसे नशीब अजमावणार!

| पाली/बेणसे | वार्ताहर |
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने पाली नगरपंचायत निवडणुकीस इच्छुक उमेदवारांची मुलाखत व तालुका आढावा बैठक नुकतीच पार पडली. तसेच यावेळी मनसे तालुका नवीन पदाधिकर्‍यांची नेमणूक करण्यात आली. पाली नगरपंचायत निवडणुकीत मनसे नशीब अजमावणार असून, या बैठकीत रणनीती आखण्यात आली. मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, उपजिल्हा अध्यक्ष अंकुश म्हात्रे, मनसे महीला आघाडी रायगड जिल्हा सचिव लता कळंबे व मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.

Exit mobile version