| पाली/गोमाशी | वार्ताहर |
पाली ते भावशेत ठाकूरवाडी ही बस सेवा सुरू व्हावी यासाठी गेली कित्येक वर्षे नागरिकांनी प्रयत्न केले होते. मात्र प्रत्यक्षात ही बससेवा शिवजयंतीचे औचित्य साधून सोमवारी (दि.19) सुरू करण्यात आली. या मार्गावरील पाली ते भावशेत ठाकूरवाडी ही पहिली बस फेरी सकाळी 9.30 वाजता सुटली. त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने चालक, वाहक, बस व्यवस्थापक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच, या मार्गावर दुपारी 3 वाजता आणि सायंकाळी 5.30 वाजता अशा नियमित तीन फेर्या मारल्या. सकाळी सुटलेल्या बसफेरीला स्थानिक नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिला. ही बससेवा शाळकरी विद्यार्थी, अबालवृद्ध, महिला भगिनी, सर्वसामान्य जनतेसाठी खूप उपयोगी पडणार आहे.
यावेळी पांडुरंग दंत, नरेश बैकर, दिनेश भोईर, बाळू जाधव, हरीचंद्र दंत, विलास तांबट, रघुनाथ सीताराव, ज्ञानेश्वर जाधव, भगवान डिसें, अशोक दिसे, सुधीर दंत, अनिकेत दंत, मारुती दंत, निलेश दंत, गजानन दंत तसेच, आपटवणे, भावशेत, झाप, भावशेत ठाकूरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.