| रेवदंडा | प्रतिनिधी |
प्रतिवर्षाप्रमाणे साळावमध्ये साळबादेवीचा उत्सव व पालखी सोहळा उद्या बुधवार, दि. 23 एप्रिल रोजी चैत्र कृष्ण दशमीच्या दिवशी मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने साळाव ग्रामस्थांनी आई साळबादेवी मंदिरात सकाळी ठिक 6 वाजता साळबादेवी मातेचा अभिषेक व महापूजा, सकाळी 7 वाजता महाआरती, दुपारी 12 ते 3 महाप्रसाद, दुपारी तीन वाजता आई साळबादेवीची पालखी सोहळा मिरवणूक अशा कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
आई साळबादेवीच्या मंदिरात नारायण तेलंगे हे गुरव म्हणून काम पहातात. यंदाचा उत्सव सोहळा यशस्वीरित्या पार पडावा यासाठी साळाव गावाचे संजय पाटील अध्यक्ष, दत्ता कांबळी खजिनदार, महिंद्र कांबळी सचिव, दिनेश पाटील, आदिनाथ सानेकर, रूपेश पाटील, आदेश पाटील, महेश सानेकर, गणेश कांबळी, व समीर पाटील परिश्रम घेत आहेत.