ग्रामदैवतांचा पालखी सोहळा उत्साहात

। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील सावरोली गावाचे ग्रामदैवत भैरवनाथ बुवा देवस्थान मंदिराचा 1 मार्चला जीर्णोद्धार सोहळा पार पडला. यानिमित्त गावात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी पाच ब्राह्मणांच्या मंत्रघोषणेत मूर्तीची विधीवत पूजाअर्चा करुन सोहळ्यास प्रारंभ झाला. त्यानंतर गावातून ढोलताशांच्या गजरात भैरवनाथ बुवांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामदेवतांच्या जयघोषाने गाव दणाणून गेला होता.

कीर्तनकार हभप जंगले महाराज शाश्री यांनी ज्ञानदान केले. यावेळी खा. सुनील तटकरे, माजी आ. सुरेश लाड यांनी हजेरी लावून मंदिर पाहून व ग्रामस्थांचे कौतुक केले. यावेळी जि.प. माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी राजिप सभापती नरेश पाटील, अंकित साखरे, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, नवीन घाटवळ, संदीप पाटील, दिलीप पोरवाल यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त अडीच हजारांहून अधिक ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Exit mobile version