कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त पालखी सोहळा

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील पिरकोन येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे रविवारी (दि. 22) पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या पालखी सोहळ्यात विद्यालयाचे चेअरमन जीवन गावंड यांच्या हस्ते पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तसेच उपस्थित पाहुणे पिरकोन गावच्या सरपंच कलावती पाटील, स्कूल कमिटी सदस्य ए.डी. पाटील, रमाकांत जोशी, दहागाव माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष मुकुंद गावंड, अनुरुद्र पाटील, अनिल पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्या राजश्री म्हात्रे, प्रा. प्रमोद म्हात्रे, शाळेच्या प्राचार्या सुजाता बल्लाळ, शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version