दस्तुरी फाट्यावर पालखी,वारकर्‍यांना सुविधा पुरवा -शेडगे

खोपोली | वार्ताहर |
दस्तुरी येथील पालखी व दिंडी निवासस्थान विसावा ठिकाणी वारकर्‍यांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष निधीची गरज असल्याची मागणी धनगर समाजाचे नेते बबन शेडगे यांनी केली आहे.
गोवरदेव (कांजूरमार) येथील आई एकविरेच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताप्रसंगी ते बोलत होते.यावेळी लक्ष्मण बावदाने, भाऊ शेडगे, बाळासाहेब हिरवे (मल्हारवाडा), बबन खरात, भरत कोकरे, सतीश शेडगे, हनुमंत बुरूमकर, नारायण हिरवे, दत्ता शेडग आदी उपस्थित होते.
खोपोलीपासून सुरू होणार्‍या बोरघाटातील दस्तुरी येथे शिंग्रोबा कमिटीच्या वतीने येणार्‍या बहुतांश पालखी व दिंड्याचे यथोचित सत्कार करून त्यांच्या विश्रांतीसाठी विशेष सहकार्य व नाष्टाची सोय शिंग्रोबा कमिटीच्या माध्यमातून करण्यात येत असते. मात्र याठिकाणी काही सुविधांचा अभाव असल्याने शिंग्रोबा कमिटीला मदतीचा हात देताना मोठी कसरत करावी लागत असून ही सर्व कसरत दूर व्हावी आणि वारकरी मंडळींना योग्य सुविधा मिळावी यासाठी विशेष निधीची गरज असून या निधीच्या माध्यमातून याठिकाणी काही सुविधा उपलब्ध करता येतील, असे मत व्यक्त केले आहे.

Exit mobile version